शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

चूक



चूक 

आपल नात
आपणच जपल पाहिजे
त्याच्या सन्मानासाठी
थोड आपण लपल पाहिजे
जे पेरल
तेच उगवाणार आहे
सांग सखे
 इथे कोण नागवणार आहे ?
नियतीने दिलेली
भूमिका आपण निभवायची
आपली माणसे आपणच का तोडायची ?
कधी तुझी
कधी माझी
जरी झाली चूक
तरी दुरुस्त करायची मूक

                       @ विलास  फुटाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा