मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

गुडबाय २०१३

गुडबाय २०१३

तेरावे वर्ष सरले, आता कवित्वउरले
संपूनकाही गेले, काही पुरून उरले

प्रस्थापितांनादिधली, लोकांनी खूप चाप
पोस्टरफाडूनिया, आला समोर “आप”

भयभीतमहिलांचे, सबलीकरण झाले
बलिदान निर्भयाचे; सत्तांतरणझाले

आलातो लोकपाल, लोकांकरिता ढाल
पाहूकरेल काय, तो गुप्त धन माल

टाळुनीआफ्रिकेला, अपुला सचिन लढला
दुर्बलतेलाठोकून, अंतिम महान ठरला

त्याटीम इंडियाची, दुर्गत हो खूप झाली
आफ्रिकीरणभूमीत, रणछोड सिध्द झाली

त्यागाचीपरिभाषा, कृत्त्याने सिध्द केली
नेल्सन मन्डेलांची, आत्ताचअर्थी गेली

लोहियापाठोपाठ, दाभोळकर गेले
पणएक विधेयक, देऊनी मात्र गेले

दाभोळकरखुनी, अद्याप न गवसला
तोतंत्र अद्ययावत, आहे तरी हो कसला?

तोक्रूरकर्मी अफझल, फाशीवरि लटकला
गुजरातचापरंतू, आहे सुरूच खटला

पडलेअता हो विरजण, आनंद पदहरण
बुद्धीबळाचा राजा, आला अता शरण

प्रकरणदेवयानी, किमया करून गेला
बंडाचीउर्मी अमुच्या, अंगी भरून गेला

थंडीतमुले बत्तीस, निर्वासितांची मेली
युपीच्यादंगलीने, किमया हो फार केली

चौदातआहे सौदा, सत्ता निवडणूकीचा
दुफळीचाआहे खेळ, इंग्रज रणनीतीचा

मंगलयान गेले, आकाशी स्वबळाने
चंद्राचीवारी शक्य, “राही”चे मन माने

- डॉ. काझी रफीक “राही”
 
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा